संकल्प मराठी मंडळ
Sankalp Marathi Mandal
मराठी माणूस जगाच्या पाठीवर कुठेही गेला तरी एखादं मंडळ स्थापन करतोच. त्यामागे एकच भावना,
एकच उद्देश - आपल्या बांधवाना एकत्र आणणे तसेच आपल्या पुढच्या पिढीलाही आपल्या संस्कृतीची ओळख व्हावी ही कळकळ त्या मागे असतेच. हाच विचार मनात बाळगून हे मंडळ स्थापन केले आहे. मराठी कुटुंबांनी दिवाळीतील स्नेहसम्मेलनात एकत्र येऊन या मंडळाचे २०१९ ला रोपटे लावले आणि त्याचे वटवृक्षात रूपांतर व्हावे हेही एक उद्दिष्ट.